प्रत्येक दिवशी अनेकदा आपले अमोल सुवर्ण क्षण प्रार्थनेत आणि वचनाच्या अभ्यासामध्ये घालविणे आवश्यक आहे. काही सुवर्ण वचनांचा अभ्यास करून आपल्या स्मरणात ठेवणे गरजेचे आहे. असे रोज केल्यास आपल्या रोजच्याही जीवनामध्ये पवित्रा आत्मा वास करून राहील. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:४५९ (१८८०).
देवाची अनमोल वचने तरुणांसाठी उच्च दर्जाची आहेत. ही वचने स्वर्गीचा राजासाठी सर्वश्रेष्ठ अशी आहेत. तरुणांनी नित्य पवित्रशास्त्राचा अभ्यास करावा. त्यांनी प्रत्येक वचनाचे पाठांतर करावे व स्मरणात ठेवावे. देव काय सांगतो ते ज्ञान त्यांनी त्यामधून घ्यावे. - माय लाईफ टुडे ३१५ (१८८७).
तुमच्या भोवती पवित्र शास्त्राची भिंत बांधा आणि तुम्ही पाहाल की जग ही भिंत तोडू शकणार नाही. पवित्र वचन स्मरणात ठेवा. वेळ आल्यावर सैतानावर फेका जेव्हा तो तुमच्यावर मोह टाकण्याचा प्रयत्न करेल. ख्रिस्तावर जेव्हा ती वेळ आली होती तेव्हा तो म्हणाला होता, "असे लिहिले आहे." या करवी तुम्हीही मोहावर विजय मिळवू शकता. -रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १० एप्रिल,१८८८.
तुमच्या स्मरण खोली मध्ये ख्रिस्ताची अनमोल वचने जपून ठेवा. ही वचने सोने व चांदी पेक्षा ही मौल्यवान आहेत. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:८१ (१९००).
तुम्ही काम करीत असताना खिशामध्ये पवित्र शास्त्र ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करून वचने स्मरणात ठेवा. - द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २७ एप्रिल, १९०५.
वेळ येईल तेव्हा लोक देवाची वचने शोधतील, परंतु ही वचने तुमच्या स्मरणवहीत लिहून ठेवली तर कोणीही तुमच्या कडून हिरावून घेणार नाहीत. - मनुस्क्रिप्ट रिलीज २०:६४ (१९०६).
देवाच्या वचनांचा अभ्यास करा. ते आपल्या अंतःकरण्यामध्ये साठवून ठेवा म्हणजे ते सुरक्षित राहतील. आपणास सुसंधी आहे. तो पर्यंत वचनाचा अभ्यास करू शकता. -मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १०:२९८ (१९०९).