जर आपणास स्वर्गीय गोष्टींकडे ध्यान देण्यास संतोष वाटत नाही, जर आपणास देवाचे ज्ञान मिळविण्यात रस नाही आणि ख्रिस्ताचा स्वभाव धारण करण्यात आनंद वाटत नाही, पावित्र्यामध्ये आपणास मुळीच आकर्षण नाही. तर आपणास समजेल की स्वर्गाची आशा करणे व्यर्थ आहे. देवाच्या इच्छेची तंतोतंत अनुरूपता ही ख्रिस्ती लोकांची उच्च विचार सरणी आहे.
आपणासमोर ती नित्य हवी आहे. जो देवावर आणि येशूवर प्रीती करतो त्याला देवाविषयी आणि येशू विषयी बोलणे आवडते. ख्रिस्ताने दिलेले कुटुंब आणि शुद्धतेमध्ये त्यांना हर्ष वाटतो कारण त्यांच्यावर ख्रिस्त प्रेम करतो. या विषयांकडे ध्यान दिले तर आत्म्याला मिळणारी देवाकडून असणारी मेजवानी ही आशीर्वाद, खात्री मिळते. शिष्यांनी प्रतिनिधित्व करून या जगाची चव चाखली आहे. आणि येणाऱ्या जगाची खात्री ही त्यांनी केली होती. - टेस्टमॉनिज फॉर द चर्च ५:७४५ (१८८९).
तुम्ही जर देवाच्या उजव्या हाताला असाल तर ख्रिस्त आज जरी आला तर तुम्ही तयार आहात. - इन हेवेनली प्लेसिस २२७ (१८९१).