सर्व मंडळीने सेवेचा वसा धारण करून प्रत्येक सभासदाने आपल्या ऐपतीप्रमाणे आपले कार्य करील हे पाहण्यासाठी देव दीर्घकाळ वाट पाहात आहे. देवाच्या मंडळीचे सभासद शुभवृत्त प्रसारपूर्ण करण्यासाठी नेमून दिलेले काम स्वदेशात आणि परदेशात करतील. तेव्हा संपूर्ण जगाला इशाराचा संदेश मिळेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवर आगमन वैभवाने व सामर्थ्याने होईल. -एक्टस ऑफ अपोस्टल १११(१९११).
प्रत्येक संस्थेमध्ये अशी प्रार्थना आहे की प्रत्येक वैयक्तिक कामगाराची बदली करणे. मानवाने त्याच्या ज्ञानाची प्रथा दृढ धरून ठेवली आहे. याकरवी तो मोठ्या चर्च इमारती आणि संस्थांची उभारणी करतो. मोठ्या प्रमाणात संघटना व संस्था स्थापन करण्याची सदिच्छा ठेवतो. त्यासाठी तो काम करीत राहतो. यासाठी तो जगापासून विभक्त राहातो. जगाच्या संपर्कात येण्याचे टाळतो आणि त्यांची हृदये थंड होऊ लागतात. ते स्वार्थ शोषून घेणारे बनतात. त्यामुळे ते इतरांवर प्रभाव पाडू शकत नाही. त्यांच्या आत्म्यातून देवाचे आणि मानवासाठी प्रीती निघुनजाते. ख्रिस्ताने त्याच्या प्रत्येक अनुयायांना कार्य सोपवून दिले हे कार्य आहे. प्रतिनिधित्वाकडून होऊ शकत नाही. समाजातील आजारी व गरिबांची सेवा करण्याची गरज आहे. जे हरवले आहेत त्यांना सुवार्ता सांगायची आहे. अशा वेळी हे कार्य संस्था किंवा कमिटीवर सोपवून चालणार नाही. प्रत्येक व्यतीची जवाबदारी आहे की त्याने स्वतंत्रपणे कार्य करणे आवश्यक आहे. वैयक्तिक समर्पण, वैयक्तिक कष्ट करणे आवश्यक आहे. सुवार्ता प्रसाराची हीच मुख्य गरज आहे. - द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग१४७ (१९०५).