२३ स्तोत्रसंहिता
1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्याभयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर त्यार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील. आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन.
९१ स्तोत्रसंहिता
1 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
3 देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
6 अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
7 तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.
8 तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल.
9 का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.
10 तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही.
11 देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
12 तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.
13 तुमच्याजवळ सिंहावरुन आणि विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.” आणि त्यांना वाचवीन.
१०२ स्तोत्रसंहिता
1 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
2 परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
3 माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
4 माझी शक्ती निघून गेली आहे. मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे. मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
5 माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
6 मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे. जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
7 मी झोपू शकत नाही. मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
8 माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात. ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
9 मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे. माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस. तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे. मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील. तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात. त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील. देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल. देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
18 पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
19 परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील. परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
20 आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल. ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.
21 नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील. ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
22 सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये परमेश्वराची एकत्र सेवा करतील.
23 मला माझ्या शक्तीने दगा दिला. माझे आयुष्य कमी झाले.
24 म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस. देवा, तू कायमचाच जगणार आहेस!
25 तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.
26 जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
27 पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस. तू सर्वकाळ राहाशील.
28 आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”
आजचा दिवस परमेश्वराने घडवलेला आहे. ( स्तोत्र ११८:२४ )
आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझे जीवित
सफल करील. ( स्तोत्रसंहिता ३७:५ )
सफल करील. ( स्तोत्रसंहिता ३७:५ )
![]() |
बाइबल |
कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सनातन आहे आणि
त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. ( स्तोत्र १०० : ५ )
माझे दिवस तुझ्या हाती आहेत; माझ्या वैर्यांच्या हातातून,
माझ्या पाठीस लागणार्यांपासून
मला सोडव. ( स्तोत्रसंहिता ३१ : १५ )
- १ योहान ४:१५
जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो, तर देव त्याच्यामध्ये राहतो आणि तो देवामध्ये राहतो.
- १ योहान ५:५
येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे?
- मत्तय १८:१९-२०
मी आणखी तुम्हाला खचीत सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. २०. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.
मत्तय १६:२६
मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?
मत्ती ११:२८
हे सब परिश्रम करने वालों और बोझ से दबे लोगों, मेरे पास आओ; मैं तुम्हें विश्राम दूंगा।
फिलिप्पैकरांस ४:६-७
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला काळवा. म्हणजे सर्वंबुद्धिसामर्थाच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
मत्तय ७:७-८
मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.
योहान १४:६
येशूने त्याला म्हटले, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे" माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
यूहन्ना ८:३२
तुम सत्य को जानोगे, और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा।
प्रकटीकरण २२:१३
'मी' अल्फा व ओमेगा म्हणजे 'पहिला व शेवटला,' आदी व अंत असा आहे.
मत्तय ५:४४
मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रेम करा, [जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
१ योहान १:८:९
जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणि आमच्यामध्ये सत्य नाही.
जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.
१ योहान ३:८
जोपापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्टकरावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला.
१२८ स्तोत्रसंहिता
1 परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात.
2 तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील.
3 घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
4 परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल.
5 परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेममध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो.
6 आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
१३० स्तोत्रसंहिता
* परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा *
१ हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे.
२ हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या शब्दाकडे तुझे कान लागोत.
३ हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू तुझ्यापुढे कोण टिकाव धरील ?
४ तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.
५ मी परमेश्वराची अपेक्षा करितो, माझा जीव अपेक्षा करितो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरितो.
६ पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकर्यापेक्षा, माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
७ हे इस्राएला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे; त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे.
८ तो इस्राएलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील.
१३१ स्तोत्रसंहिता
1 परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.
2 मी अगदी अविचल आहे. माझा आत्मा शांत आहे.
3 माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या बाळासारख अविचल आणि शांत आहे.
4 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.