जो पर्यंत देवाच्या आत्म्याला आपण पूर्णपणे समर्पित होत नाही तो पर्यंत मानवाच्या हृदयाला आनंदाचा अनुभव येणार नाही. याकरवी आपल्या आत्म्याचे परिवर्तन होऊन ख्रिस्ताची प्रतिमा आपल्या मध्ये येईल. यातून आपल्या अंतःकरण्यातील वैऱ्यांचे हृदय जाऊन ख्रिस्ताचा विश्वास आणि त्याची प्रीती आपल्या मध्ये वास करते. गर्वाची जागा नम्रता घेते. आत्म्याला सत्याचे सौंदर्य कळते आणि ख्रिस्ताचा सन्मान त्याचे सद्गुण व त्याचे पूर्ण स्वरूप प्राप्त होते. त्याचा स्वभाव निर्माण होत्तो. - अवर हाय कॉलिंग १५२ (१८९६).
आपल्या स्वभावात उत्तेजितपण नसेल, बुद्धीचातुर्य नसणार किंवा हृदयाचा कल नसणार परंतु हळूहळू देवाच्या आत्म्या करवी त्याचा नियंत्रणाखाली या सर्व गोष्टी येण्याची गरज आहे. - पेट्रीआर्क अँड प्रोफेट्स ४२१ (१८९०).
तो आपल्या आत्म्यातील अंधकार दाखवितो, आपल्या दुर्लक्षणाविषयी सांगतो. आणि आपल्या अनेक गरजांमध्ये सहाय्य करतो. परंतु आपले मन सतत देवा बरोबर रहाणे आवश्यक आहे. आणि जर जगिक आकर्षणाला आपल्या मध्ये येण्याची परवानगी दिली तर प्रार्थना करण्याची इच्छा राहणार नाही किंवा देवाशी संबंध ठेवण्याची इच्छा होणार नाही. कारण तो सामर्थ्य आणि ज्ञानाचा देव आहे. त्या कडे दुर्लक्ष केले तर तो आपल्यामध्ये राहणार नाही. - यावर हाय कॉलिंग १५४ (१९०४).