नूतनीकरण झालेले हृदय त्यातील मिठाची चव दररोज दाखविल्याशिवाय शांत राहत नाही. अशा प्रकारची चव जगाला रोज समजते. देवाची पवित्र दया दररोज मिळविण्यारची गरज असते. नाहीतर मनुष्यामध्ये बदल होणार नाही. - यावर हाय कॉलिंग २१५ (१८९७).
प्रभूच्या वचनावर तुमचा विश्वास बळकट होऊ द्या. सत्याची जिवंत साक्ष दृढ धरा. वैयक्तिक तारणारा म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो आपला युगानुयुगांचा खडक राहील. - इव्हाजिलिजम ३६२ (१९०५).
जगावर उफाळून येणाऱ्या आश्चर्यासाठी ख्रिस्ती लोकांनी तयारी केली पाहिजे. जी आश्चर्ये देवाच्या वचनामध्ये देऊ केली आहेत.आणि तयारी रोज देवाची वचने वाचून प्रार्थना पूर्वक जीवनाने करावयाची आहे. झटून अभ्यास करून लोकांना त्यांच्या भावी जीवनाविषयी कल्पना देऊन त्यांची तयारी करायची आहे. - प्रोफेट्स अँड किंग्स ६२६(१९१४).
जे बायबलच्या सत्यावर पूर्णपणे बळकटी धरून राहतील तेच शेवटच्या महान संघर्षामध्ये टिकून राहतील. - द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ५९३, ५९४, (१९११). लोकांना देवाची इच्छा काय आहे. हे समजण्याची गरज आहे. त्याच्या तत्वज्ञानाचे सत्य दिले आहे ते पद्धतशीरपणे घेण्याची गरज आहे. यामुळे येणाऱ्या संकटकाळी त्यांचा पूर्ण उपयोग होईल आणि हे सत्य इतरांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक तत्वांचे गुपित समजेल. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२७३ (१८८५).