Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

येणाऱ्या घटना देवाच्या हाती

 

events are in Gods hands-suvarta.in
येणाऱ्या घटना देवाच्या हाती

जग हे नियमांशिवाय नाही. येणाऱ्या घटनांचा कार्यक्रम देवाच्या हाती आहे. स्वर्गीय न्यायाधीशाकडे आता राष्ट्रांचे प्रारब्ध आहे. तसेच त्याच्या मंडळींची काळजी त्याच्याच हवाली आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:७५३ (१८८९). ही सांकेतिक प्रदर्शने (सापासारखी जी रानामध्ये जी प्रदर्शित केली होती) यांचा दुहुरी हेतू होता. यामुळे देवाचे लोक दोन गोष्टी शिकले त्या म्हणजे त्यांना या जगामध्ये शारीरिक त्रासामुळे किंवा जुलूमातून जावे लागतेच परंतु आत्मिक व धार्मिक चळवळींनाही तोड द्यावे लागेल जी त्यांच्या नियंत्रणामध्ये आहेत. विशेषतः शब्बाथ पालनाची जबरदस्ती केली जाईल. जी रविवार शब्बाथाचे वारे जोरदार वाहील. म्हणजे रविवार शब्बाथ पालनाचा जोर केला जाईल. - मनुस्क्रिप्ट रिलीज १९:२८९ (१९०२) 


या महान संपणाऱ्या काळामध्ये आपल्याला तारांबळ आणि गोंधळाच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. आपल्याला माहित नाही की या गोष्टींना कसे हाताळावे परंतु आपण विसरू नये की स्वर्गीय तीन महाशक्ती कार्यरत आहेत. त्या पवित्र शक्तीचा हात सुकाणूवर आहे आणि देव आपला उद्देश पूर्ण करेल. - इव्हॅजिलिझ्म ६५ (१९०२). 


अयोग्य हाताच्या पंखांच्या मार्गदर्शनाखाली गोंधळ होणारच. म्हणून मानवाने नेहमी पवित्र हाताचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. परंतु करुबाचे मार्गदर्शन कार्य पृथ्वीवर अजूनही राहणार (पाहा- याहेज्केल-  १:४,२६ ; १०:८ दानिएल- ४:१७,२५, ३२) - एजुकेशन १७८ (१९०३). 


मानवाच्या इतिहासामध्ये राष्ट्रांची प्रगती राजांचे पतन आणि उठणे हे सर्व मानवाच्या पराक्रमावर अवलंबून आहे. त्याच प्रमाणे जसे घटनांची पातळी त्याचा शक्तीवर अवलंबून असते. जसे ठरविले जाईल, या घटनांना आकार येऊ लागतो. परंतु देवाच्य वचनाचा पडदा बाजूला सारून दर्शविले आहे की वरखाली आणि मनुष्याच्या  सर्व घडामोडीमध्ये दयाळू परात्पराचे हस्तक, साधने, त्यांची इच्छा याचा सल्ला शांतपणे, संयमाने, कार्याविन्त होत आहे. - प्रोफेट्स अँड किंग्स   ४९९, ५०० (१९१४).   


विपत्तीमध्ये देवाचा हेतू

समुद्रातील भयंकर विपत्ती म्हणजे काय समुद्रातील जहाजे काहीही सूचना न देता अचानक दूरवर फेकली जातील व नाश पावतील ? जमिनीवरील अपघात म्हणजे काय ? भूमीकडून अपघात म्हणजे काय ? श्रीमंतीची संपत्ती जी गरीबांची पिळवणूक करून जमा केली. अग्नी ने गिळंकृत केली. अत्याचार व जुलूम करून मिळवलेल्या संपत्तीचा नाश होण्यापासून देव वाचविणार नव्हता. कारण देवाचे नियम शब्बाथ व करार त्यांनी पायदळी तुडविले होते. खऱ्या शब्बाथाऐवजी ढोंगीपणाचा शब्बाथ त्यांनी स्वीकारला होता. 

god help me-suvarta.in - jesus coming soon
देवाच्या पीडा आधीच सुरु झाल्या आहेत. जगातील सर्व मोलवान गोष्टी स्वर्गातून आलेल्या आहेत. अग्नीने भस्म होत आहे. स्वर्गातून आलेला तो देवाचा श्वासच होता हा न्याय व्यावसायिक ख्रिश्चनांना समझणार नाही काय ? पापी लोक जसे त्याच्या समोर थरथर कापत व भयभीत होतात तसेच हेही कदाचित होतील.  - मनुस्क्रिप्ट रिलीज ३:३११ (१९०२). 


ही सर्व संकटे आणण्यामध्ये देवाचा हेतू आहे की सर्व स्त्री पुरुषांना जाणीव व्हावी की त्यांनी निर्माण कर्त्याला विसरू नये. निसर्गाकरवी देवाने मानवासाठी अनपेक्षित संकट आणले कारण देवाच्या वचनावर त्यांनी मनामध्ये संशय घेतला व त्याला विसरून गेले. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १९:२७९ (१९०२). 


अनेकदा आपण भूकंप, आग, पूर, आणि झंझावात अग्नी प्रलयाविषयी ऐकतो यामुळे अतोनात नुकसान होते. अनेक जीवांचा नाश होतो, संपत्ती नष्ट होते. या सर्व आपत्ती आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचे नियंत्रण करणे हे मानवाच्या हाताबाहेर आहे. कारण हे नैसर्गिक संकट असेल परंतु या सर्व गोष्टींमध्ये देवाचा हेतू आपण वाचू शकतो. देवाचा हेतू हाच की आता तरी स्त्री पुरुष यांनी जागृत व्हावे आणि या धोक्यांची त्यांना जाणीव होऊन त्यांनी देवाकडे वळावे. - प्रोफेट्स अँड किंग्स २७७ (१९१४)  


स्वर्गाचे पृथ्वीवर विशेष लक्ष

पाहिल्या खुनाचे जीवन सहन करून देवाने संपूर्ण विश्वावर येणाऱ्या महान संघर्षचा परिणाम सहन करण्याचा एक धडा दिला. देवाचा हेतू केवळ बंडाळी मोडून काढण्याचा नव्हता परंतु याचा परिणाम किती महाभयंकर आहे. हे विश्वभर दाखवून द्यायचे होते. आपल्याला या जगामध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटना विश्वातील इतर जग आत्मीयतेने पाहत आहेत. 

jesus is coming are you ready-suvarta.in
स्वर्गाचे पृथ्वीवर विशेष लक्ष

सर्व विश्वाच्या सक्षमतेत देवाने आपली दया पायरीपायरीने आपल्या योजना अंतर्गत आपला हेतू पूर्ण होण्यासाठी चालू ठेवली. - पेट्रिआर्च अँड प्रोफेट्स ६८-६९  (१८९०). 


संपूर्ण विश्व जगामध्ये चाललेला हा चांगला आणि वाईटाच्या संघर्षाचा शेवट मोठया तन्मयतेने पाहत आहेत. - प्रोफेट्स अँड किंग्स १४८ (१९१४). आपले हे लहानसे जग संपूर्ण विश्वाला एक धड्याचे पुस्तक आहे. - डिझायर ऑफ एजेस १९ (१८८९).  एलन व्हाईट लिहितात की स्वर्गीय दूत आणि पतन न पावलेली जगे गेथसेमेनी बागेत येशूची तळमळ पाहत होते. (डी ए ६९३). ख्रिस्त आणि सैतान व त्याचे सहकारी यांच्या मध्ये चार हजार वर्षे जो संघर्ष चालू होता तो ख्रिस्ताने जिंकला या सर्व गोष्टी सर्व स्वर्ग आणि पतन न पावलेले जग पाहात होते. अर्थात क्रुसावर येशूला विजय मिळाला. हे सर्व या घटनांचे साक्षी आहेत. - पहा (डिझायर ऑफ एजेस ६९३, ७५९, ७६०).  



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : १८