Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिष्यांनी ख्रिस्ताला त्याच्या येण्याविषयी विचारले

 

The second coming of the Son of man is the mystery-suvarta.in

ख्रिस्ताचे वचन जे मत्तय २४:२ बोलले गेले होते ते लोकांच्या घोळक्यासमोर बोलले गेले होते परंतु जेव्हा तो एकटा होता तेव्हा पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया त्याच्याजवळ आले आणि जेव्हा तो खाली बसला. तेव्हा शिष्यानी त्याला विचारले ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे चिन्ह व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय ? 


येशूने आपल्या शिष्यांना यरुशलेमेचा नाश आणि त्याच्या महान दिवसाच्या येण्याविषयीचे उत्तर वेगळेपणे दिले नाही. या दोन घटनांमध्ये त्याने आणखी काही मिसळले. त्या दिवसातील भविष्याचे वर्णन त्याने केले. त्याने दाखवून दिले की त्याच्या लोकांना असह्य अशा गोष्टी घडतील. या संकटाविषयी व त्याच्या लोकांना असह्य अशा गोष्टी घडतील. या महान संकटाविषयी व त्यांचा अर्थ शोधण्याचा अभ्यास करण्याचे कार्य त्याने शिष्यानां दिले.  - डिझायर ऑफ एजेस ६२८ (१८९८) 


येशूच्या येण्याची वेळ कोणालाच ठाऊक नाही

अनेकजण स्वतः ला अँडव्हेंटिस्ट समजतात. त्याच्या येण्याची वेळ ठाऊक असल्याचे सांगतात त्याच्या येण्याची वेळही काहींनी ठरवली परंतु त्याचे येणे झाले नाही. आणि परिणामी त्यांच्या पदरी अपयश पडले. त्याच्या येण्याची निश्चित वेळ ही मर्त्यमानवाच्या आकलनापलीकडे आहे. देवाची सेवा करणारे स्वर्गीय देवदूत जे मानवाच्या तरुणाच्या कार्यामध्ये सहकार्य करतात त्यांनासुद्धा तो दिवस किंवा  वेळ ठाऊक नाही. “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही स्वर्गातील दिव्यदूतांनाही.  - टेस्टिमोनिग फॉर द चर्च ४:३०७ (१८७९)

The second coming of the Son of man is the mystery of God
पवित्र आत्म्याचा वर्षाव किंवा ख्रिस्तच्या येण्याविषयी नक्की वेळ आपणास ठाऊक नसणार. देवाने आपल्याला हे ज्ञान का दिले नाही ? तसे जर झाले असते तर आपण आपल्या वेळेचा सदुपयोग केला नसता. त्याच्या येण्यापर्यंत आपण त्याचे कार्य करण्यात घाई केली नसती आणि आपल्या वेळेनुसार कार्यात दिरंगाई केली असती. देवाचे कार्य लांबणीवर गेले असते. त्या महान दिवशी लोकांना तयार राहण्यास वेळ लागला असता. आपली अवस्था उत्साही राहिली नसती.  


तुम्ही म्हणू शकणार नाही की तो एक वर्षाने दोन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी येईल. किंवा त्याचे येणे तुम्ही दहा किंवा वीस वर्षे बंद ठेवाल. - रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २२ मार्च १८९७. 


देवाच्या त्या महान दिवसाच्या अगदी आपण जवळ आलो आहोत. चिन्ह पूर्ण होत आहेत. आणि तरीही अजून आपणास त्याच्या येण्याचा संदेश मिळाला नाही. त्याच्या येण्याची घटिका देवाने चातुर्याने आपल्यापासून लपवून ठेवली आहे. म्हणजे येशूच्या दुसऱ्या येण्याच्या त्या महान दिवशी नेहमीच आतुरतेने वाट पाहू शकू. त्याच्या येण्याची आपली रोज तयारी असावी. लेटर २८, १८९७. मनुष्याच्या पुत्राचे दुसरे येणे हे देवाचे रहस्य आहे. - डिझायर ऑफ एजेस ६३३ (१८९८) 


आमचा संदेश वेळ ठरविण्याचा नाही

येशूच्या दुसऱ्या येण्याची वेळ ठरविणे आणि ती वेळ येऊन गेली तरीही त्याचे न येणे यापैकी आम्ही नाही, येशूचे जे गौरवाने व दुसरे येणे होणार होते ते न झाल्याने पुन्हा निराश होऊन त्याच्या येण्यावर संशयास्पद नकार देण्यात येतो. परंतु तरीही दुसरा दिवस ठरवितात. आणखी दुसरा आणि मग त्यांच्यावर खोटे संदेष्टे असा छाप पाडतो. - फंडामेंटल्स ऑफ ख्रिश्चियन एजुकेश ३३६ (१८९५) 


वेळ ठरविणे हा अविश्वासाचा मार्ग

The second coming of the Son of Man is the mystery of jesus
ख्रिस्ताच्या  येण्याच्या  वेळा वारंवार ठरविणे आणि ती वेळ टळून गेली तरीही त्याचे येणे न होणे यामुळे त्याच्या येण्याचा लोकांमधील उत्साह मावळतो आणि ते अविश्वासू होतात. ख्रिस्ताच्या येण्याविषयीचा त्यांचा जो सन्मान होता तोही नाहीसा होतो. त्याच्या येण्याची वेळे ठरविणाऱ्यांकडे ते तुच्छतेने पाहतात आणि त्यांनी ख्रिस्ताच्या येण्याची वेळ ठरवून आपली फसवणूक केली म्हणून उघडपणे त्याचे येणे जवळच आले आहे या विश्वासापासून ते दूर निघून जातात. - टेस्टिमोनीझ फॉर द चर्च ४:३०७ (१८७९) 


मला समजले की ब्रदर (इ. पी) डेनिए यांनी वेळ ठरवली होती की देव येणार आहे. त्यांनी पाच वर्षाचा काळ दिला होता. मला आशा वाटते की याचे पडसाद परदेशामध्ये उमटणार नाहीत. तेव्हा असे कोणीही करू नये. ते जे करतात ते चांगले नाही. अशा प्रकारच्या पुनरुत्साहीत गोष्टीवर विश्वास ठेऊन अशा प्रकारच्या बातम्यांपासून सावध राहा. यामुळे धर्मवेड्या लोकांचे मन दुःखाविले जाते असे लोक ताबडतोब विश्वास ठेवतात. आणि फसवणूक झाल्यामुळे देवाचा आत्मा दुःखी होतो. 


आम्हाला लोकांचा उत्साह चाळवळायचा नाही ते उत्तेजित होतील त्यांच्या भावना उत्साहित होतील आणि त्यांच्या तत्वांवर त्यांचे नियंत्रण राहणार नाही. मला वाटते की आपण प्रत्येक बाजूने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कारण सैतान चवताळला आहे. तो युक्तीने लोकांच्या पोटात घुसून आणि गोड बोलून आपला कावेबाजपणा साध्य करतो. आणि आत्म्यांचे नुकसान करतो. जे काही उत्तेजित आहे, ते लोकांच्या भावनांना चालना देऊन चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडले जाते आणि शेवटी निराशाच पदरी पडते. - लेटर ३४ (१८८७)


 धर्मवेडेपणाच्या उत्तेजित झालेल्या भावना नेहमीच चुकीचा निर्णय घेतात. यामुळे मंडीळीतील एखादी व्यक्ती ठासून सांगते की तिला देवाकडून मार्गदर्शन होत आहे. असे लोक थोडे अधिक पुढे जाऊन पूर्ण न होणाऱ्या भविष्याची तारीख जाहीर करतात जे कधीच घडू शकणार नाही. त्यांच्या या यशस्वी खोटेपणाचे बीज शत्रूने त्यांच्या मनात पेरलेले असते. खोटेपणाचे आणि फसवेगिरीचे मार्गदर्शन त्यांना दिले जाते यामुळे गोंधळ आणि अविश्वास तयार होतो. - सेलेक्टड मेसेज २:८४ (१८९७)



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : २०