Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

भूकंप आणि पूर - गुन्हे, दुष्काळ, मरी

 

शत्रूने कार्य केले आहे आणि अजूनही करीत आहे. तो मोठ्या सामर्थ्याने येत आहे. आणि याच वेळी पृथ्वी वरून पवित्र आत्मा काढून घेतला असेल. देवाने आपला हात काढून घेतला आहे. आपल्याला केवळ जॉनस्टोन कडे पाहत बसावे लागले (पेन्सिल वानिया या ठिकाणी झाल्येला पुराचे नाव जॉनस्टोन आहे) 


संपूर्ण शहर या पुरामुळे उध्वस्त झाले होते. (मे ३१ यादिवशी) १८८९ मध्ये घडलेल्याला या घटने मध्ये २२०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक दिवसाच्या मुसळधार पावसामुळे धरण फुटले होते. या घटना जगाच्या शेवटच्या इतिहासापर्यंत वाढतच जातील. - सरमन्स अँड टोक १०९ (१८८९) 


भूकंपाने पृथ्वीचा पृष्ठ भाग फाटेल आणि आतील सर्व घटक उफाळून बाहेर येतील. एकदा ही घटके बाहेर आली तर ज्यांनी आपली संपत्ती इतकी वर्षे साठवून ठेवीत आहेत. त्यांचा नाश होईल. ज्या कामगार लोकांची कमाई गिळंकृत करून ती जमिनीमध्ये लपवून ठेवली होती. ती सर्व वाया गेली धार्मिक जगामध्ये सुद्धा या घटनेचा धक्का बसला. एवढेच नाहीतर जगाचा शेवट असल्याचे त्यांना समजून आले. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ३:२०८ (१८९१) 


आता अशी वेळ आहे की आता आपण पृथ्वीच्या कठीण पृष्ठभागावर उभे आहोत. आणि दुसऱ्या क्षणी जमीनीवरून चालू शकणार नाही. किंवा जमिनीवर उभे राहूच शकणार नाही. आपणास कल्पनाही नसणार अशावेळी भूमिकंप होईल. - टेस्टिमोनीज मिशनिस्टर अँड कोस्पेल वर्क्स ४२१ (१८९६)


आग, पूर, भूमिकंप आणि समुद्राच्या पोटातील  उद्रेक या सर्व गोष्टी दाखवून देतात की देवाचा आत्मा नेहमी मनुष्याबरोबर कार्य करणार नाही. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ३:३१५ (१८९७) 


मनुष्याच्या पुत्राचे ढगावर बसून येण्याअगोदर निसर्गातील सर्व गोष्टींची उलथापालथ झालेली असेल. स्वर्गातील विजेच्या कडकडाटाने पृथ्वीवर ठिकठिकाणी आगी लागतील या मुळे डोंगर उष्ण होऊन ज्वालामुखी रस उफाळून बाहेर येईल. हा ज्वालामुखी रस शहरे व खेडी जाळून भस्म करील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तप्त खडक समुद्रात फेकले जातील आणि त्यामूळे  पाणी उकळू लागेल. मोठा भूमीकंम्प होईल आणि खूप मोठे नुकसान होईल. मानवाची मोठ्या प्रमाणात हानी होईल. - द एस डी बायबल कोमेंटी ७:९४६ (१९०७). 


गुन्हे, दुष्काळ, मरी

सैतान वातावरणामध्ये आपले कार्य करीत आहे. सर्व वातावरण तो विषमय करीत आहे. आणि येथे आपण व आपले जीवन देवावर अवलंबून आहे. आपले सध्याचे आणि सार्वकालिक जीवन त्याचे आहे आणि या स्थिती मध्ये असतांना आपण अति जागृत असायला हवे, पूर्णपणे समर्पित, पूर्णपणे बदललेले आणि पूर्णपणे पवित्र असे  देवाला समर्पित करावे. परंतु आपण जणू काय पक्षाघात झाल्यासारखे बसून आहोत. स्वर्गीय देव आपणास उठविल. - सेलेक्टड मेसेज २:५२ (१८९०) 

A sign of Jesus early coming soon - suvarta.in
भूकंप आणि पूर
अंधाराचे साम्राज्य असणारांवर देवाने मर्यादा ठेवली नाही. त्यांनी वातावरण विषारी करण्याचे चालूच ठेवले होते. जीवनाचे मुख्य स्रोत हवा, अन्न पाणी हे दूषित करण्याचे सैतानाचे कार्य चालूच ठेवले. मानवाच्या जीवनावर यांचा परिणाम तर होतच आहे. परंतु अनेक प्रकारची रोगराई सुद्धा पोफावत आहे. जगामध्ये पाप वाढल्यामुळे मानवाची अशी अवस्था झाली आहे. देवाचा शाप त्यांच्यावर आला आहे. देवाने अश्या अनेक अनर्थदायक गोष्टी ठेवल्यामुळे त्याने स्वतः वर ही जवाबदारी घेतली त्याने कोणाला ही संरक्षण दिले नाही. वाचा. (निर्गम ७:३; ८:३२,१ इतिहास १०:४,१३) 

जगामध्ये शिंपडले असता आणि निवेदन फिके पडले असताना नजीकच्या दिवसात काय होईल - सेलेक्टड मेसेज ३:३९१ (१८११) 


दुष्काळ वाढत जाईल रोगराईने हजारो लोक मारतील आपल्या भोवती सैतानी कार्य चालूच आहे. सर्वत्र धोका आहे. परंतु परमेश्वराचे अनियंत्रित सामर्थ्य अजूनही कार्यरत आहे. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १९:३८२ (१८९७). मला दाखवण्यात आले की परमेश्वराचा आत्मा पृथ्वीवरून काढून घेण्यात आला आहे. देवाच्या आज्ञांचा अवमान करणाऱ्यांकडून त्यांचे सामर्थ्य काढून घेण्यात येईल. कपट कारस्थाने, खून आणि सर्व प्रकारची गुन्हेगारी ही सर्वत्र रोज वाढतच आहे. अनीती आणि दुष्टपणा इतका वाढला आहे की एखादा गुन्हा सर्व सामान्य झाला आहे. त्याचा कोणाला धक्का बसत नाही की नवल वाटत नाही. - लेटर २४ बी (१९०७)



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : १६