![]() |
आकाशातून अग्नीचे गोळे घरांवर पडत होते |
विनाशक वादळ लवकरच येत आहे आणि या क्रोधिष्ट वादळापासून स्वतःचा बचाव कारण्यासाठी देवाकडे पश्चातापी अंतःकरणाने आणि येशूख्रिस्तावरील विश्वासाने त्याच्या आश्रयाखाली येऊ या. भयानकरीतीने पृथ्वी हलविण्यासाठी परमेश्वर उठेल. आपल्या समोर आलेली संकटे आपण पाहू शकू. हजारो जहाजे खोल समुद्रात बुडतील. आरमार पतन पावतील आणि लाखो जीवाची आहुती जाईल. अचानक आगी लागतील. आणि कोणी मनुष्य ती विझवू शकणार नाहीत. पृथ्वीवरील राजवाडे भस्मसात होतील. पावसामुळे अनेक वेळा किवा वारंवार अतोनात नुकसान होईल. गोंधळ विरोध आणि मृत्यू व अचानक अपघात काही सूचना न मिळता येतील. शेवट जवळ आहे. कृपेचा काळ बंद होत आहे. चलातर आपण देवाचा शोध करू तो कदाचित मिळेल, तो जवळ आहे, तोपर्यंत त्याला बोलावू या - तरुणांना संदेश ८९, ९०. (१८९०)
जगाच्या इतिहासाच्या शेवटच्या प्रसंगी युद्धाचा कहर उठेल. जीवघेणी मरी आणि दुष्काळ पडतील. पाण्याचा प्रवाह आपली मर्यादा सोडून वाहू लागेल. पूर आणि अग्नीने संपत्ती आणि जीवांचा नाश होईल. ख्रिस्तावर जे प्रीती करतात त्यानच्यासाठी तो जागा तयार करण्यासाठी गेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी. - मारानाथा १७४ (१८९७).
अग्नीचा मोठा गोळा
मागच्या शुक्रवारी सकाळी मी झोपेतुन जागी होण्याअगोदर माझ्या समोर एक प्रभावकारक प्रसंग दिसून आला. झोपेतुन जाग आल्यासारखे वाटले परंतु माझ्या घरी नाही. खिडकीतून मला अग्नीचे भयंकर तांडव दिसले. आकाशातून अग्नीचे गोळे घरांवर पडत होते. आणि या अग्नि गोळ्यामधून अग्निबाण सर्व दिशांना फेकले जात होते. काय घडत आहे. हे पाहणे अशक्य होते कारण सर्व ठिकाणी आगी लागून सर्वनाश होत होता. हे संकट अवर्णनीय होते. काही वेळाने मला जाग आली आणि पाहिले की मी माझ्याच घरी होते. - एव्होन्डीलिझ्म २९ (१९०)
![]() |
अग्नीचा मोठा गोळा |
मी पाहिले की काही अमर्यादित अग्नी गोळा मोठ्या व सुंदर इमारतींवर पडत होते. त्यामुळे इमारतींचा नाश होत आहे. मी ऐकले की कोणी तरी म्हणाले ” आम्हला ठाऊक होते की जगावर देवाचा प्रकोप येत आहे. परंतु इतक्या लवकर येईल, हे ठाऊक नव्हते.” दुसरे काही जण दुःखाने म्हणाले “तुम्हाला जर ठाऊक होते तर आम्हाला अगोदर का नाही सांगितले ? आम्हाला काहीच ठाऊक नव्हते. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२८ (१९०९)