"जगाच्या नियतीचा नकाशा: भविष्यवाणीतून इतिहासापर्यंत"
![]() |
दानीएल २:३१-४५ - नबूखदनेझरचे स्वप्न आणि जागतिक साम्राज्ये |
दानीएलची भविष्यवाणी ही अशा दिव्य इशाऱ्यांपैकी एक महान आणि तेजस्वी भविष्यवाणी आहे — जिथे जागतिक साम्राज्यांचा उदय आणि अस्त दर्शविला आहे, आणि जिथे संपूर्ण पवित्रशास्त्रातील सर्वांत मोठे रहस्य — २३०० वर्षांच्या भविष्यवाणीची सुरुवात होते! (दानिएल ८:१४) ही भविष्यवाणी केवळ आध्यात्मिक विषय नाही, तर इतिहासाने सिद्ध झालेली, घटनांच्या वास्तवाशी जुळणारी परमेश्वराच्या योजनेची जिवंत साक्ष आहे.
बायबलमधील अशा असंख्य भविष्यवाण्या आज इतिहासात अचूकरीत्या पूर्ण झाल्या आहेत. त्या केवळ प्रतीक किंवा गूढ नाहीत, तर जगाच्या घडामोडींमध्ये परमेश्वराच्या वचनाची अचूक पूर्तता स्पष्टपणे दिसून येते. बाबेलपासून मेदी-फारस, ग्रीस, रोम आणि त्यानंतरच्या काळातील जागतिक शक्तींपर्यंत — प्रत्येक राजकीय उलथापालथ दानीएलच्या भविष्यवाणीत आधीच वर्णन करण्यात आलेली होती.
कारण बायबलमधील भविष्यवाणी म्हणजे केवळ शब्द नव्हेत — ती स्वर्गीय सत्तेने प्रेरित, अचूक आणि अटळ योजना आहे, जी आपल्याला येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थ सेवेच्या सत्याकडे आणि अंतिम न्यायाच्या तयारीकडे घेऊन जाते. जे काही परमेश्वराने सांगितले आहे, ते सर्व पूर्ण झाले आहे आणि जे अजून उरले आहे, ते निश्चितच लवकरच पूर्ण होणार आहे!
➤ तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा संदेश तुम्ही आजच समजून घ्या! छायाचित्रांच्या माध्यमातून बायबलचे भविष्य आज तुमच्या डोळ्यांसमोर उलगडत आहे. 💫आपण स्वतः सत्यता तपासून पाहू शकता — कारण सर्व मुद्द्यांना बायबलमधील ठोस पुरावे दिले आहेत. 🙏 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून, संदेश डाउनलोड करा. ⬇
✅Marathi : File Download Click here 👈 मराठी संपूर्ण संदेश