मी येईपर्यंत व्यस्त राहा, जसे प्रत्येक दिवस आपला शेवटचा आहे |
ख्रिस्ताने म्हटले, "मी येईपर्यंत कार्य करीत राहा.” (लुक १९:१३) ते थोडेच दिवस असतील. आपल्या जीवनाच्या इतिहासाची थोडीच वर्षे व लवकर समाप्त होतील. परंतु तो पर्यंत कार्य करीत राहा. -रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २१ एप्रिल १८९६.
ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शांतपणे त्याच्या दुसऱ्या येण्याविषयी शिक्षण दिले असते. सर्वानी वाचनातून शोध करणे आवश्यक आहे. परंतु त्यांनी आपल्या रोजच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नये. -लेटर २८, १८९७.
ख्रिस्ताने जाहीर केले की जेव्हा तो येईल तेव्हा त्याची वाट पाहणारे त्यांच्या कार्यामध्ये मग्न राहतील. काहीजण पेरणी करीत असतील, काही जण कापणी करीत असतील तर काहीजण जात्यावर दळीत असतील. देवाची वाट पाहणाऱ्या लोकांना आपली कर्तव्य आणि जबाबदारी सोडून केवळ ख्रिस्ताची वाट पाहात राहावी अशी त्याची इच्छा नाही. केवळ धार्मिक जीवन जगत आपल्याच कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये. -एम एस १८ अ १९०१.
या जीवनामध्ये होईल तितकी चांगली कामे करण्यात मग्न असावे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: ४८८(१८८९).
जसे प्रत्येक दिवस आपला शेवटचा आहे
आजचा हा दिवस शेवटचा आहे असे समजून जागृत राहा. प्रार्थना करा आणि काम करा. आपणासाठी त्याची मान्यता असेल. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२०० (१८८२).
आपल्यासाठी सुरक्षित हेच आहे की प्रत्येक दिवशी त्याची वाट पाहात प्रार्थना व कार्य करीत राहणे. प्रत्येक क्षण त्याची आठवण ठेवावी की तुमच्यासाठी तो मरण पावला. पुन्हा जिवंत झाला व सार्वकालिक जिवंत राहणार. कारण तो अमर आहे. -लेटर ६६, (१८९४).
रोज सकाळी स्वतःस व आपल्या कुटुंबियांना त्या दिवसासाठी शुद्ध करावे. एक महिना किंवा एक वर्षासाठी तरतूद करू नका ती तुमची नाहीत. तुम्हाला केवळ एक दिवस देण्यात येत आहे.
जसे काय तो एक शेवटचा दिवस तुमच्यासाठी पृथ्वीवर आहे. त्या दिवशी आपल्या धन्यासाठी शेवटचा दिवस म्हणून काम करा. तुमच्या सर्व योजना देवासमोर मांडा. जणू काय तो दिवस देवाने तुमच्यासाठी तुम्हाला एक संधी दिली आहे. तो तुम्हाला इशारा आहे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:४४ (१९०२).