कौटुंबिक प्रार्थनेची वेळ थोडकी आणि आध्यात्मिक फायद्याची असावी. तुमची मुले किंवा मंडळींच्या सभासदांनी, प्रार्थनेची दहशत किंवा भय बाळगु नये. कारण अशांना प्रार्थनेमध्ये रस किंवा त्यांना आवड नसते. त्यांना अश्यावेळी कंटाळा सुद्धा येतो. मोठ्या अध्यायाचे दीर्घकाळ वाचन आणि लांबच लांब प्रार्थनेमुळे मुलांना किंवा सभासदांना कंटाळा येतो आणि प्रार्थनेची वेळ संपल्यावर ते सुटकेचा श्वास टाकतात. असे घडू देऊ नका.
घरच्या वडिलांनी असा शास्त्रभाग निवडावा की तो चित्त वेधक व समजण्यास सोपा असावा. थोडी वचने आणि त्यावरील अभ्यास हा त्या दिवसासाठी पुरेसा आहे. प्रश्न विचारले जातील आणि त्यावर चर्चा किंवा मनन केले जाऊ शकते. किंवा त्या विषयाच्या घटनांवर विचार विनिमय केले जाईल. थोडक्यात प्रश्नोत्तरे आणि त्याचे स्पष्टीकरण करण्यात यावे. थोडी गीते गाऊन देवाची स्तुती करावी. तसेच थोडक्यात प्रार्थना करण्यात यावी. जे कोणी प्रार्थना करतील त्यांनी सर्वच गोष्टींची मागणी करू नये तर महत्वाच्या गरजा थोडक्यात मागाव्यात आणि देवाची उपकार स्तुती करावी. -चाईल्ड गायडन्स ५२१, ५२२ (१८८४).