संशयाचा पवित्रा घेणाऱ्या व्यक्तीला सैतानाचे हस्तक समजले जाते. परंतु ज्यांनी अविश्वासाविषयी शिक्षण घेतले असेल त्यांना केवळ ख्रिस्तावरील विश्वासानुसार आशा असून त्यांनी आपले सर्व संशय त्याच्यावर सोपवून द्यावेत. कारण तोच एकमेव आहे जो आपणास अंधारातून प्रकाशाकडे आणू शकतो. मनुष्यास स्वतःला सैतानाच्या पाशातून मुक्त होण्याची पात्रता नाही. जे कोणी स्वतःला अविश्वास, संशय आणि अविश्वास व टीकांच्या जाळ्यात अडकवून घेतात ते सत्यावर विश्वास ठेऊ शकत नाहीत. एम एस ३, १८९५.
पुस्तक : शेवटच्या दिवसातील घडामोडी
लेखक : एलन जी व्हाईट
पान नं. : ३९