ख्रिस्ताच्या सेवकांवर संकटाची वेळ येते तेव्हा त्यांना भाषणाची तयारी करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांची तयारी दिवसेंदिवस करायची आहे. देवाचे सत्य व मौल्यवान वचन त्यांच्या हृदयामधील खजिन्यात साठवून ठेवले असते. येशूची शिकवण, देवाचे वचन आणि त्यांचा विश्वास व प्रार्थना यामुळे त्यांचा विश्वास बळकट होतो. आणि जेव्हा त्यांच्यावर कसोटीची वेळ येते तेव्हा पवित्र आत्मा त्यांना वचनांचे स्मरण करून देईल. आणि ही वचने जे कोणी येतील त्यांना ऐकायला मिळतील. त्यांच्या हृदयापर्यंत जातील. जे पवित्र शास्त्रातून शोध करतील त्यांच्या हृदयामध्ये देव आपल्या ज्ञानाचा प्रकाश झोत सोडील. जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना वचनाचे स्मरण होईल. -कॉंसल्स व सब्बाथ स्कूल वर्क ४०, ४१ (१९००).
जेव्हा संकटकाळ येईल तेव्हा देवाचे लोक इतरांना वचनातून शिकवीतील तेव्हा ते स्वतःच्या स्थितीचे परीक्षण करतील. आणि दिसून येईल की त्यापैकी कोणत्याच गोष्टींमध्ये ते समाधानी नाहीत. तोपर्यंत त्यांच्या ध्यानात येणार नाही की त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. आणि मंडळींमध्ये ही अनेकजण असतील की ज्या गोष्टीवर ते विश्वास ठेवतात त्या समजत असल्याची कबुली देतात. परंतु जेव्हा संघर्ष निर्माण होईल तेव्हा त्यांचा स्वतःचा कमीपणा त्यांना समजणार नाही. जेव्हा ते विश्वासणाऱ्यांपासून विभक्त होतील. आणि एकटे रहाण्याची त्यांची वेळ येईल आणि त्यांच्या विश्वासाविषयी विश्लेषण करावे लागेल. तेव्हा त्यांना नवल वाटेल की त्यांच्या कल्पना किती गोंधळाच्या होत्या. आणि सत्य म्हणून त्यांनी स्वीकारले होते ते किती चुकीचे होते. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च- ५:७०७ (१८८९).
आध्यात्मिक सामर्थ्यावर नियंत्रण
आपल्या विश्वासावर योग्य कारण देण्याची पात्रता ही चांगली गुणवत्ता आहे. परंतु हे सत्यापेक्षा खोलवर गेले नाहीतर आत्मा वाचणार नाही. धार्मिकतेच्या मलिनतेपासून हृदय पूर्ण शुद्ध असणे आवश्यक आहे. - यावर हाय कॉलिंग १४२ (१८९३).
थोडक्यांनाच समझुन आले की स्वतःचे विचार आणि कल्पनांवर नियंत्रण ठेवणे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बेशिस्त हृदय फायदेशीत पातळीवर ठेवणे अति कठीण आहे. परंतु विचारांना योग्य दिशा मिळत नसल्यास आध्यात्मिकतेवर एकाग्र चित्त ठेवणे कठीण ठरते. त्यामुळे आत्म्याचा नाश होऊ शकतो. मनामध्ये सतत पवित्र व सार्वकालिक विचार असणे अति आवश्यक आहे. किंवा वरकरणी साधे व सोपे पवित्र विचार दाखविण्याचा ठराव ठेवावा म्हणजे याचा सराव होऊन मन शुद्ध ठेवण्याचा सराव होईल व नंतर तसे सामर्थ्य प्राप्त होईल. - आवर हायकॉलिंग १११(१८८१).
आपल्यामध्ये शुद्ध व स्वच्छ विचारांना खात पाणी देणे ही अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सरावाने आपले नैतिक बळ वाढते. हीन व अत्याचारी सामर्थ्यापेक्षा हे अति उत्तम आहे. देव आपणामधील स्वार्थी वासनांचे लाड पुरविण्यापासून आपल्याला जागे करतो. - मेडिकल मिनिस्ट्री २७८(१८९६).