हनोखाचे स्वर्गारोहण होण्याअगोदर तो ३०० वर्षे देवा बरोबर चालला पृथ्वी वरील जीवन त्याच्या मर्जीत बसत नव्हते. आजही पूर्णावस्थेमध्ये ख्रिस्ती जीवन जगण्याची आवश्यकता आहे. देवाबरोबर हनोख तीनशे वर्ष कसा चालला ? त्याच्या मनाला आणि हृदयाला देवाच्या अस्तित्वाचे शिक्षण मिळाले होते. जगाच्या गोंधळामधून त्याच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत होत्या. अशाप्रकारे देवाने त्याला आपल्या सानिध्यात ठेवले होते.
देवाला नाराज करण्याची कोणतीही गोष्ट त्याने स्वीकारली नाही. त्याने सतत देवला आपल्या समोर ठेवले. तो नेहमी प्रार्थनेत असे. मला तुझे मार्ग शिकव. म्हणजे मी चुकणार नाही. तुझा संतोष कशात आहे याची मला चिंता आहे. तुला संतोष व सन्मान करण्यासाठी मी काय करावे ? अश्या प्रकारे तो सतत आपल्या देवाकडील मार्ग तयार करीत असे. त्याच्या आज्ञांचे तंतोतंत पालन करून तो स्वर्गीय पित्यावर पूर्णपणे अवलंबून होता की देव त्याला सहाय्य करणारच अशी खात्री होती. त्याचे त्याला स्वतःचे विचार व इच्छा मुळीच नव्हती. ते सर्व त्याचा स्वर्गीय पित्याच्या इच्छेमध्ये समरस होते. आता ख्रिस्त येण्याच्या घटकेला लोकांनी कसे असावे याचे हनोख हा प्रतिनिधित्व आहे. तो एक उदाहरण आहे. मरण न येता ज्यांचे स्वर्ग रोहण होईल त्यांना हनोख हे खास उदाहरण आहे. - १ सामान अँडटोक ३२ (१८८६).
आपणावर जसे मोह येतात तसे हनोख वर ही येत होते. जे धार्मिक मुळीच नव्हते. अशा समाजाने त्याला घेरले होते. आपली अवस्था आहे ज्या वातावरणा मध्ये तो श्वास घेत होता ते पापाने प्रदूषित झाले होते. जसे आता वातावरण आहे आता जसा भ्रष्टाचार आहे. तसाच हनोखाच्या काळात ही होता. तरीही तो शुद्ध जीवन जगला. निष्कलंक राहिला. त्याच प्रमाणे आपण सुद्धा शुद्ध आणि भ्रष्ट न होता राहू शकू. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च २:१२२ (१८६८).