देवाकडे जिवंत मंडळी आहे? होय देवांची मंडळी आहे परंतु ते योद्धे आहे. तरीही ती विजयी नाही. दुःखाने सांगावेसे वाटते की मंडळी मध्ये असणारे सभासद दोषी आहेत. म्हणजे गव्हामध्ये निदनही आहे. मंडळीमध्ये सैतानाचे हस्तक आहेत. आणि गव्हामध्ये असणारे निदन हे जगाच्या शेवटापर्यंत असेल. देवाच्या मंडळीमध्ये नीतिभ्रष्टता आणि पापी प्रदूषण राहणारच ही मंडळी जगाचा प्रकाश असूनही दुर्बल आहे. दोषी आहे मंडळीमध्ये बदल आणायची गरज आहे. त्यांना इशारा देऊन सल्ला देण्याची गरज आहे. येशूने जे स्वतःचे समर्पण केले त्याची मंडळीला आठवण करून देण्याची गरज आहे. - टेस्टिमोनीज अँड गॉस्पेल वर्क्स ४५, ४९ (१८९३).
सैतानाच्या बैलासारख्या कार्याला यश येणार नाही. तिसऱ्या देवदूताचा संदेश त्यांच्या जवळ असेल. ज्या प्रकारे देवाच्या कप्तानाने यरीहोची भिंत पाडली होती. तसे देवाच्या आज्ञा लोकांना विजय मिळवून देतील. आणि सर्व विरोधी अपयशी ठरतील. - टेस्टिमोनीज तो मिनिस्टर अँड गॉस्पेल वर्क्स ४१० (१८९८).
जे देवाशी विश्वासू आहेत त्यांच्याबरोबर तो कार्य करतो
प्रभू येशूचे नेहमी निवडलेले लोक असतात जे त्याची सेवा करतात. जेव्हा यहुदी लोकांनी ख्रिस्ताला नाकारले तेव्हा त्याने देवाचे राज्य त्यांच्या कडून काढून घेतले आणि विधर्म्यांना दिले. या तत्वावर देव आपले कार्य पुढे चालू ठेविल तो प्रत्येक शाखेला कार्य नेमून देईल.
जेव्हा मंडळी त्याच्या वचनावर अविश्वास दाखवील मग त्यांचा कोणताही मुद्दा असो ते कितीही शुध्द्व असोत देव त्यांच्या बरोबर कार्य करू शकणार नाही. मग तो इतरांवर महत्वाची जबाबदारी देईल. जेव्हा ते शुद्ध व पवित्र तत्वांचा वापर करणार नाहीत. तेव्हा देव त्यांच्यावर अतिदुःख आणून त्यांना नम्र करील जोपर्यंत ते पश्चाताप करणार नाही व पापाचा तिरस्कार करणार नाहीत तो पर्यंत -मॅन्युस्क्रिप्ट रिलीजस १४:१०२ (१९०३).
इस्राएलाचा इतिहास हा आपल्यासाठी इशारा आहे
या शेवटल्या दिवसांमध्ये देवाचे लोक पुरातन इस्राएल लोकांप्रमाणे त्रासात पडतील. इस्राएल लोकांना धोक्याची सूचना मिळूनही ते सावध झाले नव्हते आणि त्यांचा नाश झाला. विधर्म्याप्रमाणे ते सुद्धा ख्रिस्ताशी अविश्वासू झाले. त्यांच्या अविश्वासू आणि अपवित्र हृदयामुळे त्यांना सर्व आपत्ती मधून जावे लागले. त्यांचा अविश्वासूपणा, कठीण मन, हट्टीपणा, आणि मानसिक अंधत्वामुळे नाश झाला होता. त्यांच्या या नाशवंत इतिहास आपल्याला धोक्याचा इशारा देतो.
बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा...कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.” (इब्री ३:१२-१४) -लेटर ३०, १८९५.
ख्रिस्तासारखी आणि विश्वासू मंडळी विजयी
ख्रिस्ताचे जीवन देवाचा पवित्र संदेश देवाची प्रीती व्यासंगपूर्ण भरपूर पुरविण्याचे कार्य देवाकडून येणारे दयेचे किरण त्याची कृपादृष्टी आणि मार्गदर्शन, करुणा, प्रीती, सत्य आणि लीनता हे सर्व गुण मंडळीच्या प्रत्येक सभासदामध्ये पुरवून त्यांना स्वतःसारखे बनविण्याचे महान कार्य ख्रिस्ताचे आहे. तो जर जोडला गेला तर मंडळी विजयी होईल. - फुंडमेंटल ऑफ ख्रिश्चियन एजुकेशन १७९(१८९१).