खोटे संदेष्टे उठतील व अनेकास फसवतील |
येरुशलेमच्या नाशाच्या चिन्हाच्या भविष्या वेळी येशूने सांगितले होते की,” पुष्कळ खोटे उठतील व अनेकास फसवतील.” (मत्तय- २४:११) सध्या खोटे संदेष्टे उठले आहेत आणि लोकांना फसविता आहेत. आणि मोठ्या संख्येने लोक नाशाकडे जात आहेत. अनेक जादूगार आणि चेटके चमत्कार करण्याचा दावा करतात. आपल्या सामर्थाने ते लोकांना डोंगरावर निर्जन स्थळी घेऊन जाऊ शकतात. हेच भविष्य शेवटच्या दिवसांसाठी सुद्धा सांगितले आहे. ही खूण येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी दिली आहे. - युगायुगाची आशा ६३१ (१८१८)
आपल्याला खोट्या हक्काशी तोड द्यावे लागतील. खोटे संदेष्टे उठतील. खोटी स्वप्ने व खोटे द्रुष्टांत होतील. परंतु देवाच्या वचनाचीच सुवार्ता सांगा देवाच्या आवाजापासून व त्याच्या वचनापासून दूर जाऊ नका. - सलेक्टड मेसेज २:४९ (१८९४)
मला दाखविण्यात आले की देवाकडून आपणास संदेश आल्याने अनेक जण हक्काने सांगतात, दावा करतात, अनेकांना ते चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. या कार्याला ते त्यांचे कर्तव्य समजतात परंतु देवाने त्यांना कोणतेच मार्गदर्शन केलेले नाही परिणामी गोंधळ माजेल. तेव्हा प्रत्येकाने आणि प्रार्थनापूर्वक प्रत्येकाने स्वतः पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा म्हणजे देवाची इच्छा समजून येईल. - सेलेक्टड मेसेज २:७२ (१८९४)