दुहेरी जीवन |
या युगामध्ये ख्रिस्ताचे ढगांवर बसून दुसरे येणे होणार आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जी घोषणा केली होती तेच कार्य आता करायचे आहे. देवाने त्याच्या लोकांना या कार्यासाठी पाचारण केले आहे. देवाच्या त्या महान दिवसासाठी लोकांना तयार करण्याचे कार्य देवाने सांगितले आहे. बाप्तिस्मा करण्याऱ्या योहानाने जसा संदेश दिला होता तसाच संदेश देवाच्या लोकांनी जगाला द्यायचा आहे. यासाठी त्यांना आध्यात्मिक अनुभव असणे आवश्यक आहे. जसा योहानाला होता. त्याच प्रकारचे कार्य त्यांच्यामध्ये घडवून येणे आवश्यक आहे. आपण देवाला दृढ धरले पाहिजे आणि दृढ धरण्याने त्यांना आपला स्वपणा सोडणे आवश्यक आहे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:३३२, ३३३ (१९०४).
देवाशी दळणवळण असलेल्या व्यक्तीचा स्वभाव थोर विचार व गुणी बनतो. यावरून इतरांना समजून येते की येशूच्या सानिध्यात असून त्याचे शिष्य आहेत. यामुळे सेवकांना ही दिसून येते की असे सामर्थ्य इतर कुठून ही मिळणार नाही. या सामर्थ्याचा वापर करून स्वतःची हानी करून घेऊ नये. आपण दुहेरी जीवन जगावे विचार आणि कृती यासाठी गुप्ता प्रार्थना आणि चिकाटीचे कार्य असावे. -द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग ५१२ (१९०५).
तुमच्या जीवनाचा व्यवसाय म्हणजे प्रार्थना व परिश्रम, परिश्रम व प्रार्थना अशी परिक्रमा असावी. हाच आपला व्यवसाय असावा, तुम्ही अशी प्रार्थना करावी की जसे काही ती देवाची स्तुती व गौरव असावे. देवाचे कार्य त्याची सेवा हे आपले कर्तव्य असावे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:५३८ (१८८१).कोणीही मनुष्य एक दिवस किंवा एक तास प्रार्थने शिवाय सुरक्षित राहू शकत नाही. -द ग्रेट कॉंट्रोव्हर्सेय ५३० (१९११).
जे कोणी केवळ प्रार्थना करतात व दुसरे काहीच करीत नाही थोड्याच दिवसात लवकरच तेही थांबवितील. -स्टेप्स टू ख्रिस्त १ मे (१८९२).
ख्रिस्तामध्ये ठाम मुळावलेले
वादळ येत आहे. या वादळामुळे मानवाच्या विश्वासाची कसोटी होणार आहे. विश्वासणार्यांना समजेल की ते ख्रिस्तामध्ये खोल वर मुळावले आहेत किंवा नाही. किंवा कोणत्यातरी चुकीच्या दृष्टीने दुरावले आहेत. - ईरव्हीजिलिसम ३६१,३६२ (१९०५).
प्रत्त्येक दिवस आपण विचारपूर्वक काही तास त्याच्या सानिध्यात घालविल्यास अतिउत्तमच होईल. ख्रिस्ताच्या जीवनावर मनन करणे अतिमहत्वाचे आहे. प्रत्येक मुद्दावर लक्ष केंद्रित करून ख्रिस्ताच्या जीवनाची कल्पना आणि ध्यान करण्यामध्ये वेळ खर्च करावा असे केल्यास त्याच्या सानिध्यात राहू. - द डिझायर ऑफ एजेस ८३ (१८९८).
सैतानावर विजय मिळवायचा असेल तर हृदयामध्ये विश्वासाने ख्रिस्त आणि त्याची धार्मिकता असणे आवश्यक आहे. जो पर्यंत आपण ख्रिस्ताशी जिवंतपाणाचा संबंध ठेवत नाही तो पर्यंत आपल्यातील स्वार्थी वृत्ती मोह इतर पापी भ्रष्टता काढू शकत नाही. आपण कदाचित अनेक वाईट सवयी बंद करू शकू परंतु सैतानाच्या बाजूचे होऊ शकू परंतु त्यामध्ये ख्रिस्ताचा जिवंतपणा नसतो. ख्रिस्ताची धार्मिकता व त्याचा जिवंतपणा प्रत्येक क्षण असणे अति आवश्यक आहे. तरच आपण सर्वप्रकारच्या वाईटावर विजय मिळवू शकतो. ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक पक्की ओळख झाल्याशिवाय आणि त्याच्याशी सतत संपर्क साधल्याशिवाय शत्रूची संगत सुटणार नाही आणि सर्वकाळ परमेश्वराच्या संपर्कात राहणेच अगत्य आहे. - द डिझायर ऑफ द एजेस ३२४ (१८९८).ख्रिस्त आणि क्रुसावरील मरण या गोष्टींचे सतत ध्यान करावे. त्याच्याशी संभाषण केल्यास तो भावनात्मक आनंद मोठाच असेल. - स्टेप्स टू ख्रिस्त १०३,१०४ (१८९२).