![]() |
भविष्य वेगाने पूर्ण होत आहे |
अनेक जण असे आहेत की सध्या काळाला लागून असलेले भविष्य त्यांना समजत नाही. म्हणून त्यांना त्या विषयी ज्ञान देणे आवश्यक आहे. पहारेकरी आणि अनभिज्ञ मनुष्याने तुतारीचा ठराविक आवाज करावा- एव्हांजिलिझम १९४, १९५ (१८७५) यावेळी आता संध्याकाळासाठी पहारेकऱयांना आपला आवाज उंचावून संदेश द्यावा. भविष्याच्या इतिहासामध्ये आपण कोठे आहोत त्यांना समजू दे - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१६ (१८८९)
![]() |
जगाचा इतिहास बंद होईल |
असा एक दिवस देवाने ठरविला आहे त्या दिवशी जगाचा इतिहास बंद होईल. “येणाऱ्या राज्याचे हे वर्तमान जगाला साक्ष व्हावे म्हणून सर्व राष्ट्रांना कळविणे आवश्यक आहे. तेव्हा शेवट होईल. भविष्य वेगाने पूर्ण होत आहे. या भयंकर आणि महत्वाच्या विषया विषयी भरपूर काही सांगणे आवश्यक आहे. प्रत्येक आत्म्याचे प्रारब्ध लवकरच कायमचे ठरविले जाईल कारण तो दिवस अगदी दारानजीक आला आहे.
हा विषय लोकांसमोर ठेवण्यासाठी आपल्याला खूप यातना सोसाव्या लागतील. हा गंभीर विषय केवळ जगातील लोकांसमोर ठेवावा असे नाही परंतु आपल्या स्वतःच्या मंडळ्यांना सुद्धा याची वारंवार सूचना द्यावी कारण आपल्या प्रभूचे येणे अचानक व अनपेक्षित होणार आहे. ही भीतीदायक सूचना प्रत्येक आत्म्यासाठी आहे. कोणीही समजू नये की येणाऱ्या संकटापासून मी सुरक्षित आहे. या विषयी मला नवल वाटणार नाही. ही महत्वाची भविष्यवाणी तुमच्या हृदयात ठसली तर तुमच्या कडून कोणीही हिरावून घेणार नाही. त्याचबरोबर आपणास असे समझून येईल. काही घटना किती जवळ आल्या आहेत - फंडामेंटल ऑफ ख्रिस्तियन एजुकेशन ३३६,३३६
भविष्याच्या घटना यथादर्शन ठेवणे
आता आपण जगाच्या भविष्याचे तंतोतंत चित्र पाहू शकत नाही. किंवा वर्णन करू शकत नाही. परंतु आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे त्या दिवसाची वाट पहा आणि प्रार्थना करा. कारण त्याचे येणे अगदी दारानजीक आहे. - सेलेक्टड मेसेज २;३५ (१९०१)
श्वापदांची खूण तीच आहे जिचे वर्णन केले आहे. परंतु नियमांची गुंडाळी तेव्हाच उघडेल जेव्हा वेळ अति थोडा असेल. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१७ (१९००)
अनेक जण आपले काम, आपले समाधान आणि स्वतः ची काळजी यापलीकडे काही पाहणार नाहीत. आणि मग शेवटी स्वतःवर संकट ओढून घेतील. यामुळे वेळे अगोदरच संकट काळ येईल. अशा संकट काळी दयेची अपेक्षा करता येणार नाही - सेलेक्टड मेसेज ३:३८३,३८४ (१८८४)
देवाच्या लोकांवर संकट काळ येणार आहे परंतु हा काळ आपल्यावर सतत राहणार नाही. इतरांअगोदर आपल्यावर तो काळ येईपर्यंत संकट काळा अगोदरचा असेल. देवाच्या लोकांची छाननी केली जाईल. परंतु मंडळ्यांमध्ये याविषयी तूर्तास सांगण्याची वेळ नाही - सीलेक्टड मेसेज १:१८० (१८९०)