Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आमच्या देवाचे महान भविष्य

God foretold the end of the world-jesus coming soon- last day on earth
शेवटच्या दिवसांमधील जग

ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना यरुशमेच्या नाशाविषयी आणि मनुष्याच्या पुत्राच्या येण्याविषयी आणि चिन्हाविषयी आगाऊ सूचना दिली होती. मत्तय पुस्तकाचे सर्व चोवीस अध्याय हा जगाचा शेवट अग्नीने होण्याची आगाऊ सूचना येरूशलेमच्या नाशाच्या रूपाने दिली होती. येरुशलेम शहराच्या नाशाचा संबंध हा जगाचा शेवटाशी आहे. हे ख्रिस्ताने सूचित केले आहे.  एमएस ७७. १८९९ 


जैतुनाच्या डोंगरावर येशूने भयानक न्यायाचा दिवस आणि त्याच्या दुसऱ्या येण्याविषयीचे भविष्य कथन केले होते. "तुम्ही लढाया विषयी ऐकाल व लढायाच्या अवई ऐकाल घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा कारण असे होणे आवश्यक आहे. राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागो जागी दुष्काळ व भूमिकंप होतील पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे". (मतय २४:६-८) येरुशलेमचा नाश हा जगाच्या नाशाचा एक भाग म्हणून दाखविला गेला आहे. शेवटच्या दिवसांमधील जगाच्या नाशाची ही एक योजना आहे. - टेस्टिमोनीझ फॉर द चर्च ५:७५३ (१८९९) 


पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : ११