![]() |
नोहाच्या दिवसांप्रमाणेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल |
आपल्या जगामध्ये आधाशीपणा आणि असंयम हा नैतिक अधपाताचा मूळ पाया आहे. सैतानाला हे माहीत आहे म्हणून तो सतत स्त्री पुरुषांना मोहात टाकत आहे. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मनुष्य आपल्या आरोग्याकडे ही दुर्लक्ष करतो. खाणेपिणी आणि पोशाखाचा फॅशन हा त्यांच्या जीवनाचा मुख्य भाग झालेला आहे. या मुळे तो जगाशी समरस झाला आहे. नोहाच्या काळामध्ये जी स्थिती लोकांची होती तशी शेवटी असेल. जगाच्या इतिहासाच्या शेवटी हीच अवस्था असेल. लवकरच जगाचा शेवट होणार असल्याची ही लक्षणे आहेत. - लेटर ३४, (१८७५)
जलप्रलयापूर्वी लोकांचे जे चित्र दिले गेले आहे त्यामुळे आधुनिक समाजामध्ये ही त्या सर्व गोष्टी जलदगतीने घडणार आहेत या विषयी आपल्याला प्रेरणा मिळते. - पॅट्रिक्स अँड प्रोफेट्स १०२ (१८९०)
आपल्याला ठाऊक आहे की देव लवकरच येत आहे. नोहाच्या दिवसाप्रमाणे सध्या आपले जग जलद गती ने बदलत आहे. स्वार्थीपणावर अधिक लाड होत आहेत. खाण्यापिण्या चे अतिलाड होत आहेत. मनुष्य विषारी दारू पित आहेत. त्या मुळे लोक वेडे बनत आहेत. - लेटर ३०८ (१९०७)
जबरदस्ती चा अत्याचार
नोहाच्या दिवसांमध्ये सत्याला विरोध करणाऱ्यांचा पूर आला होता तसेच खोट्यापणाचे मोहमय प्रेमाचे व मोहाचे जाळे विणले जात आहे. अत्याचाराने सर्व भूमी भरली आहे. गुन्हेगारी, लढाया आणि खून दारदिवशी घडले जात आहे. येशूच्या येण्याअगोदर जसे घडणार आहे अगदी तसेच घडत आहे. - द एस द बायबल कॉमेंटरी १ : १०९० (१८१९)
कामगार संघ ताबडतोब दंगेधोपे आणि अत्याचारावर उतरतो. त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तोडफोड सुरु होते. जगाचा आणि देवाचा कधी मेळ होणार नाही. अत्याचार हे लोकांचे वस्तीस्थान आहे. कोणीच विज्ञान पद्धती सांगू शकणार नाही की सैतानाचे हस्तक दुष्टाईचे कार्य कशाप्रकारे करीत आहे. प्रत्येक गर्दीमध्ये सैतानाचे दूत कार्यरत असतात. रागात असलेल्या लोकांकडून ते अत्याचाराचे कार्य सहजतेने करू शकतात.

मनुष्याची दुष्टाई आणि कुटीलता अशा उंचीवर पोहोचेल की देव स्वतः त्याचा न्याय प्रगट करील. लवकरच जगाची दुष्टाई आपली मर्यादा ओलांडेल. आणि नोहाच्या दिवसामध्ये परमेश्वराने जस न्यायाची ओतणी केली तसेच होईल. - द उपवर्ड लुक ३३४ (१९०३)
खून, चोऱ्या, दरोडे, रेल्वेचे अपघात आणि आताच्या ह्या सर्व घटना हेच सांगतात की जगाचा शेवट अगदीच जवळ आला आहे. आणि प्रभूचे येणे लवकरच होणार आहे. त्यासाठी आपली तयारी असावी. - लेटर (१९०७)