Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

स्वर्गातील चिन्हे - पृथ्वीवरील चिन्हे

 

Signs of the last days on earth-jesus coming soon--last day events -suvarta.in
शेवटच्या दिवसातील चिन्हे

पोप सत्येच्या महान छळानंतर ख्रिस्त जाहीर करतो, सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. पुढे स्वर्गातून ताऱ्यांचे पतन होईल. आणि तो म्हणाला “अंजिराच्या झाड्याचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे तुम्ही समजा.” (मतय ४:३२-३३) 


ख्रिस्ताने त्याच्या येण्याच्या चिन्हांविषयी सांगितले होते. त्यांने सांगितले होते की त्याचे येणे जवळ अगदी दारानजीक आहे. आपल्याला समजेल तो म्हणतो की जे ही चिन्हे जे पाहतील “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” ही चिन्हे आली आहेत. (पाहा- महान संघर्ष ३०६-३०८, ३३३,३३४) आता आपणास खात्री झाली आहे की प्रभूचे येणे अगदी हाताशी आहे. (युगायुगाची आशा ६३२ (१८१८) 


पृथ्वीवरील चिन्हे

येशूने स्पष्ट सांगितले आहे.” तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यात चिन्हे घडून येतील राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील. (लूक २१:२५ मतय २४:२९ मार्क १३:२४-२६ प्रकटीकरण ६:१२:१७) ज्यांना त्याच्या येण्याची सूचना समझते त्यांना कळेल की त्याचे येणे अगदी दारानजीक आहे." मतय २४:३३ महान संघर्ष ३७, ३८ (१९११). राष्ट्रे अस्वस्थ झाली आहेत. आपल्यावर गोंधळाची वेळ आहे. जगावर येणाऱ्या गोष्टींमुळे लोकांची हृदये भीतीने गारठली आहेत. परंतु ज्यांचा देवावर विश्वास आहे. त्यांना वादळातून आवाज ऐकू येईल की “मी आहे, भिऊ नको.”- द सायन्स ऑफ द टाइम्स, ९ ऑक्टोबर १९०१. 

Signs of the last days on earth - jesus coming soon-suvarta.in
Signs of the last days

स्वर्गीय पुस्तकांमध्ये अनोळखी घटनात्मक इतिहासाची नोंद करण्यात आली आहे. ज्या घटनांचे भविष्य केले आहे त्याची पूर्तता लवकरच त्या महान दिवशी होणार आहे. जगातील सर्व काही विस्कळीत झाले आहे. - मेन्यूस्क्रिप्ट रिलीझ ३:३१३ (१९०८) 


पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : ११