ही आपणास सुवर्ण संधी आहे की जेव्हा तो येईल तेव्हा आपण तयार असणे अति आवश्यक आहे. आणि तेही शीघ्र जे त्याच्या नावाचा अंगीकार करतात. त्याची फळे त्यांच्यामधून दिसतात. त्यामुळे त्याच्याच नावाचे गौरव होते. असे जर झाले तर त्याच्या सुवार्तेचे बीज सर्वत्र पेरले जाईल. असे अगोदरच झाले असते तर शेवटची महान कापणी कधीच झाली असती आणि ख्रिस्त आला असता आणि आपले अनमोल धान्य गोळा केले असते. - ख्रिस्त ऑब्जेक्ट लेसन, ६९(१९००).
जगाला येणाऱ्या राजा ची सुवार्ता सांगून त्याचे येणे लवकरच करण्याचे सामर्थ्य आपल्या हाती आहे. आपण त्याच्या येण्याची केवळ वाटच पाहात नाही. तर देवाचा तो दिवस लवकरच येईल. (२ पेत्र ३:१२) - द डिझायर ऑफ एजेस ६३३(१८९८).
या जगातील दुःख दूर होण्यासाठी त्याने मानवाचे सहकार्य करून त्याचे येणे लवकरच येण्याचे केले आहे. - एजुकेशन, २६४ (१९०३).
देवाच्या संयमाची मर्यादा
जगावर अमर्यादित प्रेम करणारा देव जरी असला तरीही सर्व राष्ट्रांच्या हिशोब अचूक व तंतोतंत ठेवतो. त्याच्या प्रेमळ दयेने तो त्यांना पश्चाताप करून मागे येण्यासाठी पाचारण करतो. तोपर्यंत त्यांच्या चुकांचा हिशोब तो उघडा ठेवतो. परंतु हा आकडा ठरावीक मर्यादेपर्यंत पोहोचल्यास देव त्याची कृपा काढून घेतो. तरीही पश्चातापाची क्षमा करतो. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२०८ (१८८२). देव राष्ट्राची नोंदणी ठेवतो. स्वर्गातील पुस्तकांमध्ये हा आकडा वाढत आहे. आणि जेव्हा पहिल्या दिवसांच्या शब्बाथावर शिक्कामोर्तब होते तेव्हा त्यांच्या आज्ञा उल्लंघनाच्या पापाचा प्याला पूर्ण भरतो व ते शिक्षेस पात्र ठरतात. - द एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९१० (१९८६).
देव राष्ट्रांची मोजणी ठेवतो. जेव्हा वेळ पूर्ण होते तेव्हा त्यांची मलिनता देवाच्या प्रीतीची मर्यादा ओलांडून जाते तेव्हा त्याचा संयम ही संपतो. जेव्हा स्वर्गातील पुस्तकाची नोंदणी मर्यादा संपते तेव्हा लोकांवर त्यांच्या अनाचराचा देवाचा कोप प्रगट होतो. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:५२४ (१८८९).
जेव्हा देवाची कृपा मानवाच्या अत्याचाराची मर्यादा ओलांडून जाते. मानवाचे पाप इतके वाढते की देवाच्या कृपेचे सादरीकरण कमी होते. आणि न्यायाचे कार्य सुरु होते. - पेट्रिक्स अँड प्रोफेट्स १६२,१६५ (१८९०).
यहोवाचा न्यायदंड ठराविक मर्यादेच्या पलीकडे विलंबित ठेवता येत नाही. - प्रोफेट्स अँड किंग्स, ४१७ (१९१४).
आज्ञाभंगाची मर्यादा जवळ जवळ संपली आहे
आणखी थोडावेळ मग पृथ्वीवर राहणाऱ्यांच्या पापाच्या मलिनतेचा प्याला भरून जाईल. तेव्हा कोप त्यांच्यावर अचानक येईल. आतापर्यंत तो शांत होता तो जागा झाला आहे. आता हे अविचारी जग त्याच्या कोपाचा प्याला पिईल. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:३६३ (१८६३).

मलिनतेचा प्याला जवळ जवळ भरला आहे, आणि देवाचा योग्य न्याय अपराध्यांवर येणार आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:४८९ (१८८०).
जगामध्ये राहणाऱ्यांची दुष्टाईचा कप मलिनतेने जवळ जवळ भरला आहे. हे जग नष्ट करण्याची देवाने परवानगी दिली आहे तो नाश आता येणार आहे. तो आणिलच. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:१४१ (१९०२)
देवाच्या आज्ञांचे उल्लंघन आता पूर्ण होत आहे. सर्वत्र गोंधळ माजला आहे व मानवावर आता लवकरच भयंकर संकट येत आहे. आपण जे सत्या जाणणारे आहोत आपण आपली पूर्ण तयारी करायाला हवी कारण लवकरच येणाऱ्या महान संकटाची चाहूल लागली आहे. अर्थात या महान संकटाचे नवल वाटणार नाही. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:२२ (१९०४).
देवाचा महान दिवस आपल्या मनामध्ये ठेवा
आपल्या समोर असणाऱ्या न्यायाविषयीचे ज्ञान आपणास असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या महान दिवसाची आपणास जाणीव राहील. ही जाणीव राहिल्यास पुढील सर्व काही आपणास उमजेल आणि याचा आपल्या स्वभावावर प्रभाव पडेल. एक बंधू मला म्हणाला, “सिस्टर, व्हाईट या दहा वर्षांमध्ये देवाचे येणे होईल असे आपणास वाटते काय? तो जर दोन चार किवा दहा वर्षात आला तर तुम्हाला काही फरक वाटेल का?” मी विचारले का? तो म्हणाला, “मला वाटते दहा वर्षात तो जर येत असेल असे वाटते तर मी काहीतरी वेगळे केले असते. “मी म्हणाले “तुम्ही काय केले असते?” मी विचारले “का? मी माझी सर्व मालमत्ता विकली असती आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास केला असता. तसेच लोकांना ही त्याच्या येण्याचा इशारा दिला असता. आणि त्यांचीही तयारी केली असती. आणि देवाला विनंती केली असती की तुला भेटण्यासाठी मी तयार राहीन तो म्हणाला.

मग मी विचारले जर तुम्हाला समजले की देव अजून वीस वर्षे आला नाहीतर तुम्ही वेगळे पणाने वागला असता का ?
तो म्हणाला,“मला तसे वाटते.”
त्याचे हे उत्तर किती स्वार्थीपणाचे उत्तर त्याने दिले दहा वर्षे जरी देव आला नसता तर तो निष्काळजीपणानेच वागला असता आणि त्याने आपली तयारी केली नसती परंतु हनोख तर ३०० वर्षे देवाबरोबर चालला. हा आपल्यासाठी धडा आहे की आपण दररोज देवा बरोबर चालले पाहिजे. जोपर्यंत आपण येण्याची वाट रोज पाहत नाही तर आपण सुरक्षित नाही. - एमएस १०, १८८६.
वेळेची कमतरता

जे निष्काळजी व आळशी आहेत त्यांच्यासाठी देव रात्रनदिवस विश्रांती देणार नाही. कारण ते देवाचे कार्य करीत नाही. शेवट जवळ आहे. यामुळे येशूने आपणास सतत त्याच्यासमोर ठेवले आहे. कारण वेळ थोडा आहे. - लेटर ९७, १८८६.
जेव्हा आपण तारणाऱ्याबरोबर मस्तकावर सोन्याचा मुकुट धारण करून हातात विणा घेऊन काचेच्या समुद्रावर उभे राहू तेव्हा कधीही न संपणाऱ्या सार्वकालिकतेच्या तुलनेने कृपेचा काळ आणि त्याची वाट पाहण्याचा काळ किती अल्प होता याची जाणीव होते. - मेन्यूस्क्रिप्ट रिलीज १०:२६६ (१८८६).