Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

दुष्ट आत्म्याचे मानवी रूपात प्रगट होणे

Revelation of evil spirits in human form
दुष्ट आत्म्याचे मानवी रूपात प्रगट होणे

दुष्ट दूतांना मेलेल्या पाप्यांचे आणि संतांचे रूप घेऊन प्रकट होणे हे कठीण नव्हते. देवाच्या लोकांची फसवणूक करण्याचे काम ते करतात. त्यांच्या डोळ्यांसमोर ते दृष्य रूपाने येतील. यामुळे देवाच्या लोकांच्या मनात संशय निर्माण होईल. आणि अशा घटना वारंवार घडतील. अशा चमत्कारिक घटना शेवटी सतत घडत राहतील.


यामध्ये सैतानाचे कार्य यशस्वी होते ते म्हणजे ज्यांचे प्रियजन कबेरेमध्ये असतील त्यांच्या रूपात दुष्टदुत त्यांच्या समोर प्रकट होतील. आणि मृतजन जिवंत असताना जसे बोलत वागत होते तसेच त्यांच्या रूपातील दुष्टदुत स्वतःला प्रगट करतील व त्यांना फसवतील. अश्याप्रकारे ते देवाच्या लोकांना व इतरांची दिशाभूल करतील. या दृष्ट दूतांचे वागणे व बोलणे लोकांवर देवाच्या वचना पेक्षा जास्त प्रभाव टाकतील. -सायन्स ऑफ द टाइम्स २६ ऑगस्ट, १८८९.


ज्या लोकांचे आप्तजन त्यांच्यापासून दुरावले आहेत सैतान आपल्या सामर्थ्याने त्यांना त्यांच्यासमोर घेऊन येईल. अश्या प्रकारे सैतान खोटे सोंग रचून लोकांची दिशाभूल करतो. कारण ही त्यांची नक्कल बेमालूम असते. परिचित दृष्टिक्षेप, परिचित शब्द बोलण्याची पद्धत अगदी तशीच असणार दुष्ट आत्म्यांकरवी अनेकांची खात्री होईल. मृत झालेले आणि आमच्या समोर उभे असलेले आमचेच आप्त मित्र आहेत यात मुळीच शंका नाही. आणि हे आत्मे अगदी वचनाच्या विरुद्ध सांगून त्याविषयी लोकांची खात्री करून देतात. ही गंभीर बाब आहे. खोट्या मृतात्म्यांची ही भेट काही चमत्कार करून लोकांच्या भावनांशी खेळतात आणि देवाच्या  वचनांपासून त्यांना दूर भटकवतात.



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : ९२